बस-ट्रक भीषण अपघातात २ जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालक आणि एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास १० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे ५ च्या सुमारास झाला. एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे(४३, रा. चिवरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि नागुबाई राम रेवगे(४८ रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

अपघातग्रस्त एसटी बस पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे ही बस जात होती. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅण्डवर पोहोचली. त्यानंतर सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळगीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास सुरू आहे.

ट्रकला एसटी बसची मागून धडक
कुरकुंभहून निघालेल्या एसटी बसने साळईने भरून निघालेल्या ट्रकला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. सोलापूर बस स्थानकातून उमरगा (एम एच १४ एल बी ०३८०)(जिल्हा धाराशिव) कडे निघाली असता पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद सोलापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे
१. रामचंद्र प्रभाकर देवघे (वय वर्ष ५७ राहणार अंदुर जिल्हा धाराशिव )
२. विकास प्रकाश पाटील (वय वर्ष ३२ राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा )
३. माणिक नागप्­पा वायचळ (वय वर्ष ५४ राहणार तांदूळवाडी तालुका दक्षिण सोलापूर )
४. रामलिंग ब्रह्मानंद कापसे (वय वर्षे ४० राहणार धाराशिव )
५. अभिषेक दीपक चव्हाण (वय वर्ष २५ राहणार उमरगा धाराशिव )
६. अनिकेत सुभाष राठोड (वय वर्ष ३० राहणार सातारा )
७. अभिजीत अरुण चव्हाण (वय वर्ष ४४ राहणार नळदुर्ग जिल्हा धाराशिव )
८. नागोराव किस्तू तोडसांग (वय वर्ष ३७ राहणार किणवर परभणी )
९. अनुराधा अर्जुन चव्हाण (वय वर्ष ६० राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव )
१०. तुलसीदास मनोहर पाचंगे (वय वर्ष ४९ राहणार गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव )

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news