जिंतूर : जिंतूर- औंढा महामार्ग रस्त्यांवरील मैनपुरी मंगल कार्यालय समोर असलेल्या रस्त्यावर दुचाकी- टेम्पो यांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ३ जन जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना दि.२३ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे. जिंतूर- औंढा महामार्ग रस्त्यांवरील मैनपुरी मंगल कार्यालय समोरील रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पो व दुचाकी वाहन एकमेकांना धडकले.
या भिषण अपघातात दुचाकीवरील तीन जन जखमी होवून रस्त्यावर पडले होते. महामार्ग पोलिसांनी या जखमींना वाहनातून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ.गजानन काळे, सिस्टर धबडगे यांनी जखमी विजय पुंडगे (वय २२), मंगेश खिल्लारे (वय २७), वैभव धुळे (वय २३) सर्व रा.जुनूवाडी ता.जितूर या तिघांवर प्राथमिक उपचार केले. मात्र यातील विजय पुंडगे यांच्या डोक्याला, डाव्या पायाला, हातावर तर मंगेश खिल्लारे यांच्या डोक्याला, डाव्या पायाच्या घोट्यावर गंभीर इजा झाल्याने दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बातमी देईपर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती.