लातूर : राज्यात नावलौकिक असलेल्या व कमी कालावधीत उभारणी करून उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणाऱ्या रेणापूर तालुक्यातील दिलीप नगर (निवाडा) रेणा सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून देण्यात येणारा २०२२-२३ या वर्षातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार प्राप्त झाले असून या पुरस्कारामुळे मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेल्या रेणा साखर कारखान्याचा राज्यभरात साखर इंडस्ट्रीजमधे कार्याचा दबदबा निर्माण झाला आहे या पुरस्काराने रेणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे
रेणा साखर कारखान्याची उभारणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाली. कमी कालावधीत उभारणी करणारा व कर्जाची परतफेड करुन शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला हा कारखाना अतिशय सुंदर नियोजन करत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारा हा रेणापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा आर्थिक बदल घडवलेला कारखाना अशी ओळख लातूर, रेणापूर तालुक्यांतील व शेजारी असलेल्या अंबेजोगाई, परळी, केज तालुक्यात या कारखान्याची ओळख आहे
कारखान्याची दमदार कामगिरी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नियोजनाने वाटचाल करत रेणा साखरने कारखानदारीत विविध विक्रम करुन राज्यातील सर्व साखर कारखान्यापुढे रेणा कारखान्याने एक आदर्श निर्माण केला असुन कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये मिल मधील उसाचा तंतूमय निर्देशांक, रिडयुस्ट मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर गाळप क्षमतेमध्ये वाढ, गाळप क्षमतेचा वापर तसेच देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च इत्यादिचा तसेच साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रीया खर्च व एकुण उत्पादन प्रक्रीया खर्च हा राज्याच्या सरासरी साखरेच्या उत्पादन प्रक्रीयापेक्षा कमी असल्याने, खेळत्या भाडवंलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खेळत्या भाडवंलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा कमी व इतर कारखान्याच्या तुलनेत इन्व्हेंटरी व्यवस्थापन सर्वोत्कृष्ठ आहे. यासह इतर निकष पाहता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे संस्थेच्या वतीने दिले जाणारे गळीत हंगाम २०२२-२३ या सालातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्काराचे ११ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण
सदरील मानाचे पुरस्कार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे ११ जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या अन्य मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
लोकनेते विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्घोजकता पुरस्कार शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास जाहिर
तसेच रेणा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत केलेला कै. विलासराव देशमुख सर्वोत्कष्ट उद्योजकता पुरस्कार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप हे मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रक्कम रुपये एक लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. कारखान्याने यापुर्वी राष्ट्रीय साखर महासंघ दिल्ली यांचेमार्फत देण्यात येणारे देश पातळीवर व वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे यांचे मार्फत देण्यात येणारे तसेच राज्यस्तरीय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार व राज्यशासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कारसह विविध १४ पुरस्कार कारखान्याने मिळवलेले आहेत.
रेणाला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
रेणा साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेच्या वतीने गळीत हंगाम २०२२-२३ या सालातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता व उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार मिळाल्याबददल कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे तसेच संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतकरी, सभासद, व्यापारी,सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.