27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी सोपवली नेत्यांवर विभागवार जबाबदारी

लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी सोपवली नेत्यांवर विभागवार जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी) : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज्यातील सर्वच लोकसभा तसेच सोबतच विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणीची जबाबदारी त्यांनी पक्षातील नेत्यांवर सोपविली आहे. संघटनात्मक बांधणीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील १० महत्त्वाच्या नेत्यांवर सोपविली आहे. १० विभागीय नेते त्यांनी जाहीर केले आहेत. सोबतच स्वत: उध्दव ठाकरेही मैदानात उतरणार आहेत. जानेवारी महिन्यात उध्दव ठाकरे स्वत: राज्यव्यापी दौरा करणार असून राज्यव्यापी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

पक्षातील अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे गट थोडा सावरला असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी आता आगामी लोकसभा तसेच त्यानंतर होणा-या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या १० नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी १० नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी असेल तर अरविंद सावंत यांच्यावर पश्चिम विदर्भ तर भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जानेवारीत उद्धव ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा
लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने उध्दव ठाकरे हे येत्या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात राज्यव्यापी दौरा करणार आहेत. सोबतच पक्षाचे राज्यव्यापी शिबिरही आयोजित करण्यात येईल. उध्दव ठाकरे यांच्या दौ-याचे नियोजन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
नेते आणि सोपविण्यात आलेले विभाग
संजय राऊत
उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)

अनंत गीते
कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा – पनवेल, कर्जत, उरण)

चंद्रकांत खैरे
मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना

अरविंद सावंत
पश्चिम विदर्भ
लोकसभा मतदारसंघ बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा

अनिल देसाई
पश्चिम महाराष्ट्र
लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी

भास्कर जाधव
पूर्व विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर

विनायक राऊत
कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी, सिंधुदुर्ग

राजन विचारे
कोकण (ठाणे, पालघर)
लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर

रवींद्र वायकर
मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ नांदेड, हिंगोली, परभणी

सुनील प्रभू
मराठवाडा, सोलापूर
लोकसभा मतदारसंघ सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR