28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeअंतरराष्ट्रीयगाझामध्ये यूएनचे कलम ९९ लागू

गाझामध्ये यूएनचे कलम ९९ लागू

संयुक्त राष्ट्र : युनायटेड नेशन्सचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे गांभीर्य लक्षात घेऊन यूएन चार्टरच्या अनुच्छेद ९९ला गाझामध्ये लागू केले आहे. हे कलम संयुक्त राष्ट्राची सर्वात महत्वाची तरतूद मानली जाते. या अंतर्गत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आणणारी कोणतीही बाब सुरक्षा परिषदेच्या लक्षात आणून देतात. ही संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील सर्वात शक्तिशाली तरतूद मानली जाते. हे कलम संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात फक्त नऊ वेळा वापरला गेला आहे आणि याचा वापर अनेक दशकांपासून करण्यात आलेले नाही.

युनायटेड नेशन्स युद्धामुळे निर्माण झालेल्या मानवतावादी आपत्तीबद्दल आठवड्यांपासून चेतावणी देत ​​असून संघर्ष थांबविण्याचे आवाहन करत आहे. परंतु आता अँटोनियो गुटेरेस यांनी त्यांचे सर्वात शक्तिशाली संकट सिग्नल जारी केले आहेत. या संकटावर देशांचे लक्ष केंद्रित केले जाऊ शकते आणि मानवतावादी युद्धविराम लागू केला जाऊ शकतो. यूएन कौन्सिलचे बहुतेक सदस्य युद्धविरामाच्या समर्थनात आहेत परंतु इस्रायलचा जवळचा मित्र आणि यूएनमध्ये व्हेटो असलेला अमेरिका या युद्धबंदीच्या समर्थानात दिसत नाही.

गाझामधील सार्वजनिक सुव्यवस्था पूर्णपणे नष्ट होईल, असे गुटेरेस यांचे मत आहे. युएनचे म्हणणे आहे की, गाझामध्ये ज्या प्रकारचा विध्वंस होत आहे, ते बघता आता गाझा पूर्वीच्या वातावरणात परतणे फार कठीण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी केलेल्या युद्धबंदीच्या आवाहनावर इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत गिलाड एर्डन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलला मानवतावादी आधारावर युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते. यावर इस्रायलने नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कोणतीही जागा आता सुरक्षित नाही
गुटेरेस यांनी कौन्सिल सदस्यांना लिहिले की, गाझामध्ये राहणारे प्रत्येकजण गंभीर धोक्यात जगत आहे कारण गाझामधील कोणतीही जागा आता सुरक्षित नाही. त्यांनी असेही लिहिले आहे की गाझाची संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे कारण रुग्णालये युद्धभूमी बनली आहेत. लोकांकडे जगण्यासाठी आवश्यक साधने नाहीत आणि या सगळ्यात इस्रायल सतत बॉम्बफेक करत आहे.

भारताला सत्यासोबत उभे राहिले पाहिजे
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी गुरुवारी म्हणाल्या की, इस्रायल गाझावर सतत बॉम्बफेक करत आहे, भारत आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग आहे आणि भारताला सत्यासोबत उभे राहिले पाहिजे. भारत नेहमीच न्याय आणि पॅलेस्टिनींच्या दीर्घ संघर्षासाठी आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहिला आहे. भारताने अजूनही तेच केले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR