27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत काका-पुतण्यात लढत?

बारामतीत काका-पुतण्यात लढत?

युगेंद्र पवारांनी दिले विधानसभा लढविण्याचे संकेत

बारामती : प्रतिनिधी
बारामती लोकसभा निवडणुकीनंतर बारामती मतदारसंघातील राजकारण बदलून गेले आहे. अजित पवारांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना ५० हजारांहून अधिकचे लीड मिळाले. अजित पवार आपल्या पत्नीला स्वत:च्या मतदारसंघातही लीड देऊ शकले नाहीत. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होऊ शकते अशी शक्यता आहे. याबाबत युगेंद्र पवार यांनीही संकेत दिले आहेत.

शरद पवार हे युगेंद्र पवारांना घेऊन आतापासूनच मैदानात उतरले आहेत. पवारांनी संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हेच मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान काटेवाडीत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, संपूर्ण बारामती आपलं घर असलं, तरीसुद्धा आपलं मूळ गाव काटेवाडी आहे. सर्वांत दबाव काटेवाडी, कन्हेरीमध्ये झाला. इथल्या अनेक स्थानिक पुढा-यांकडून झाला. तुम्हाला सोपा प्रश्न आहे, की साहेब बारामतीचे नसते, तर आज बारामती अशी असती का? साहेबांमुळे बारामतीचा खरा विकास झाल्याचे यावेळी युगेंद्र पवार यांनी नमूद केले.

मंत्रालयात तुम्ही काटेवाडीचे आहेत असे सांगितले, की लगेच खुर्ची आणि मान मिळतो. आताच्या वेळी पैशांचा वापर झाला; पण ३ महिन्यांनी तुम्ही त्यांना दाखवून द्या, की १०० मतांनी आपण पुढे कसे पाहिजे.’ तुम्ही अजिबात कमी पडला नाहीत, तुम्हाला धन्यवाद म्हणतो, अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR