24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकेंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

इंदूर : केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील भाजपचे उमेदवार प्रल्हाद पटेल रस्ता अपघातात जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना घेऊन जाणारी कार आणि मोटारसायकल यांच्यात टक्कर झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मोटारसायकल चालवणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मंत्र्यांसह चार जण जखमी झाले आहेत. अमरवाडा भागातील सिंगोडीजवळ हा अपघात झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) सुधीर जैन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. भाजपचे उमेदवार बंटी साहू यांचा प्रचार करून प्रल्हाद पटेल नरसिंगपूरला परत जात होते. बंटी साहू विधानसभा निवडणुकीत छिंदवाडा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या विरोधात उभे आहेत.

शिक्षक निरंजन चंद्रवंशी असे या घटनेतील मृताचे नाव असून ते ३५ वर्षांचे होते. घटनेच्या वेळी ते आपल्या मुलासह घरी परतत होते. १७ नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत छिंदवाडा विधानसभा मतदारसंघातून राज्य काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार बंटी साहू यांच्या प्रचारानंतर पटेल नरसिंगपूरला परतत होते. याशिवाय जखमींमध्ये १७ वर्षीय जतीन, १० वर्षीय संस्कार आणि ७ वर्षीय निखिल यांचा समावेश असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR