31.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeराष्ट्रीयकेंद्रीय मंत्री एक्स्प्रेसमधून अचानक झाले बेपत्ता

केंद्रीय मंत्री एक्स्प्रेसमधून अचानक झाले बेपत्ता

तीन तासांच्या शोधानंतर सकाळी दुस-या स्टेशनवर सापडले

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा प्रवाशांची चूकामूक होण्याच्या घटना घडत असतात. मात्र रेल्वेतून केंद्रीय मंत्री बेपत्ता झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली असेल. केंद्रीय मंत्री जुएल ओराम हे रेल्वे प्रवासातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम अचानक गोंडवाना एक्स्प्रेसमधून गायब झाले. ते दिल्लीहून जबलपूरला जात होते. जुआल ओराम हे शेवटचे दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना दिसले होते. त्यानंतर सकाळी जेव्हा ते बर्थवर नसल्याचे कळताच एकच गोंधळ उडाला.

केंद्रीय मंत्री जुआल ओराम हे शनिवारी ३ एप्रिल रोजी दिल्ली ते गोंडवाना एक्सप्रेसने प्रवास करत होते. रविवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास गाडी मध्य प्रदेशातील दमोह स्टेशनवर थांबली. त्याचवेळी जुआल ओराम यांची साखरेची पातळी कमी झाली आणि ते काहीतरी खाण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले. मात्र तितक्यात गाडी सुरू झाली. केंद्रीय मंत्र्­यांनी गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. सुदैवाने ते प्लॅटफॉर्मवरच पडल्यामुळे त्यांना जास्त दुखापत झाली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR