19.4 C
Latur
Monday, October 13, 2025
Homeलातूरनिलंगा तालुक्यात अज्ञातांनी दोन शेतक-यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या

निलंगा तालुक्यात अज्ञातांनी दोन शेतक-यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या

निलंगा : मागच्या अनेक दिवसांपासून अस्मानी संकटाने परेशान झालेल्या शेतक-याचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी व ताडमुगळी येथील दोन शेतक-यांच्या सोयाबीन बनमी जाळून शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम अज्ञातानी केले आहे.

निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सूमनबाई व सिद्धार्थ बाबुराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या सहा एकर मधील सोयाबीन काढून जमा केलेली बनीम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेटवली. त्यामुळे शेतक-याचे ७० ते ८० कट्टे सोयाबीन जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच ताडमुगळी येथील शेतकरी गुंडेराव माधवराव गवंडगावे यांच्या सर्वे नंबर १७९ मधील २ एकरातील सोयाबीन काढून शेतात बनीम लावून ठेवली होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सांयकाळी ६ च्या दरम्यान शेतकरी शेतात नसलेला अंदाज घेऊन पेटवून दिली.

एकाच रात्रीतून दोन शेतक-यांच्या बनमी पेटवून दिल्याने शेतक-यांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. काम करणा-या लोकांवर कोण कारवाई करेल व या शेतक-यांना कशी नुकसान भरपाई मिळेल हे संकट शेतक-यासमोर उद्भवलेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी आर्थिक टंचाईचा फटका शेतक-याला बसला आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी होणार हे संकट घोंगावत आहे. दोन्ही शेतक-यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे.

या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी लहाने व कृषी सहाय्यक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून महसूल प्रशासनाला कळविण्यात आले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाकडून शेतक-यांना या संकटात काही मदत होईल का याची अपेक्षा केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR