परळी तालुक्यात अवकाळीचा कहर

परळी : परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात सोमवारी दुुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि सुसाट वादळी वा-याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेली ज्वारी, गहू आणि हरभरा पिके शेतातच जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सोमवारी दुपारपासून अचानक आलेल्या पावसाने आणि जोरदार वा-याने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. लमान तांडा, दारावती तांडा, वसंतनगर, मलकापूर, वैजवाडी, मोहद्रा आणि केशवनगर या भागात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतक-यांच्या आशा रब्बीवर होत्या, मात्र अवकाळीने या कष्टावर पाणी फिरवले आहे.

पिंपळगाव गाढे शिवारात वादळाचा तडाखा
पिंपळगाव गाढे शिवारातील कोंबडमारी परिसरात वा-याचा वेग इतका प्रचंड होता की, अवघ्या दोन मिनिटांत अनेक झाडे मुळासकट उखडून पडली. अनेक ठिकाणी वीज खांबही जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठे आहे.

धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश
नुकसानीची व्याप्ती पाहता माजी कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हाधिका-यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परळी व अंबाजोगाई परिसरातील बाधीत शेतक-यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनीही जिल्हाधिका-यांनी वैयक्तिक लक्ष घालून दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news