33 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रगूगल लोकेशन चुकीचं दाखवल्यामुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित

गूगल लोकेशन चुकीचं दाखवल्यामुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित

छत्रपती संभाजीनगर : आज देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी)परीक्षा होत आहे. देशातील विविध राज्यातील केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे.दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये गूगल मॅपवर चुकीचं परीक्षा सेंटर लोकेशन दाखवल्यामुळे २० ते २५ विद्यार्थ्यांना फटका बसला असून, या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट देण्यात आलं होतं त्यावर विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर असा पत्ता देण्यात आला होता. मात्र, जेव्हा हा पत्ता गूगल मॅपवर टाकण्यात आला त्यावेळी गूगल मॅपने वाळूज एमआयडीसीमधील लोकेशन दाखवलं.

याचा फटका मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थीना बसला, यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२४ दोन शिफ्टमध्ये घेतली जात असून, पहिला पेपर सकाळी ९.३० वाजत घेण्यात येणार असून, दुसरा पेपर दुपारी २.३० वाजता घेण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR