मुंबई : राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्या ‘लव सेक्स और धोखा’ या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. तर आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
हा चित्रपट येणार याची चर्चा जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून नेटक-यांना फारच उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता असे म्हटले जाते की या चित्रपटात उर्फी जावेद ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात उर्फीचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे.
‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेदने आधी एका मालिकेत संस्कारी सुनेची भूमिका साकारली होती आता ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर या चित्रपटाची थीम ही तिच्या पर्सनॅलिटीला शोभेल अशी आहे.
बालाजी टेलीफिल्म्स आणि कल्ट मूव्हीजच्या ‘लव सेक्स और धोखा २’ या चित्रपटाचं प्रोडक्शन दिबाकर बॅनर्जी करणार आहेत. तर एकता कपूर आणि शोभा कपूर हे प्रोड्युसर आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. असे म्हटले जाते की या चित्रपटात मोनी रॉय आणि तुषार कपूर हे पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत.