38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाश्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर लाहिरू थिरिमाने रुग्णालयात दाखल

श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर लाहिरू थिरिमाने रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या अपघातासारखा अपघात आज घडला. श्रीलंकेचा माजी स्टार क्रिकेटर लाहिरू थिरिमाने याला गुरुवारी श्रीलंकेच्या अनुराधापुरा येथील थ्रीपेन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिरिमानेला किरकोळ दुखापत झाली असून त्याला अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी ७.४५ च्या सुमारास थिरिमानेची कार विरुद्ध दिशेने येणा-या एका ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. अडा डेराना यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात ट्रकचालकासह कारमधील अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.

२१ वर्षीय थिरिमाने याने २०१० मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले आणि पुढील काही वर्षे तो श्रीलंकेच्या संघाचा नियमित सदस्य होता. पण, प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला प्रत्येकवेळी संधी मिळाली नाही. तिलकरत्ने दिलशानच्या निवृत्तीनंतर थिरिमानेला संधी मिळाली. त्याने अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत संघाचे काही सामन्यांत नेतृत्वही केले. २०२२ मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याने ४४ कसोटींत ३ शतकं व १० अर्धशतकांसह २०८८ धावा, १२७ वन डे सामन्यांत ३१९४ धावा केल्या. त्यात ४ शतकं व २१ अर्धशतकांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR