17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये ओबीसी-मराठा वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर

बीडमध्ये ओबीसी-मराठा वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर

रोहित पवारांचा गंभीर आरोप

अमरावती : बीड शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलने होत आहेत. सरसकट कुणबी दाखल्यांच्या त्यांच्या मागणीला ओबीसींचा विरोध असून मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत.

बीडमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता, असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे. तसेच बीडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तशी परिस्थिती जानेवारी महिन्यात अनेक ठिकाणी दिसेल, असेही ते यावेळी म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली. या दंगलीमुळे मोठ्या प्रमाणावर मतांचे विभाजन झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीअगोदर ओबीसी विरुद्ध मराठा आता पुढे येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे दंगल हे वातावरण का केले जात आहे याचा लोक विचार करायला लागले आहेत. बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला गेला होता. बीडमध्ये जशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये होती तशी परिस्थिती जानेवारी महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यांत केली जाणार आहे.

संविधान टिकवण्यासाठी भाजपला बाहेर ठेवावे लागेल
रोहित पवार यांनी या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार उभे न करण्याचे आवाहन केले आहे. रोहित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला मी विनंती करतो की, संविधान टिकवायचे असेल तर भाजपला आपल्याला बाहेर ठेवावे लागेल. त्यामुळे अशा उमेदवारांना उभे नका करू जेणेकरून त्याचा लाभ भाजपला होईल. सगळ्यांनी मिळून ही लढाई लढावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR