वैभवचे ११ चेंडूत वेगवान अर्धशतक

दांबुला : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील साखळी फेरीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरललेल्या वैभव सूर्यवंशीने आज सुरू असलेल्या फायनलमध्ये आपल्या फलंदाजीचा रुद्रावतार दाखवला. पहिल्या चेंडूपासून चौकार षटकारांची बरसात करत वैभव सूर्यवंशीने अवघ्या ११ चेंडूत ४५४.५४ च्या भन्नाट स्ट्राईक रेटसह ५० धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली. वैभवने ११ चेंडूत ठोकलेले अर्धशतक हे लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. या खेळीदरम्यान वैभवने सर्वात वेगवान अर्धशतकाचा कौशल्या विरारत्नेचा विक्रम मोडीत काढला. त्याने १२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सुरू असलेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या भारतीय सलामीवीरांनी या संधीचा लाभ घेत श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्यात वैभव सूर्यवंशीने तर खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आक्रमक सुरुवात केली. दरम्यान, श्रीलंका अ संघाकडून सिराझने टाकलेल्या तिस-या षटकात वैभव सूर्यवंशीने तीन षटकार आणि दोन चौकारांसह २८ धावा चोपून काढल्या.

त्यानंतर पुढच्या षटकात आणखी १६ धावा वसूल करत वैभवने अवघ्या ११ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद करताना वैभव सूर्यवंशीने पाच चौकार आणि पाच षटकार ठोकले. उल्लेखनीय बाब म्हणजे या पन्नास धावा वैभवने केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच काढल्या. यादरम्यान, त्याने एकही धाव धावून काढली नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news