28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रवळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त ही भेट घेत असल्याची माहिती आहे. मात्र, याच भेटीदरम्यान दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. रयत शिक्षण संस्थेबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले आहेत.

या भेटी दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे.

शरद पवारांचे खंदे शिलेदार अजित पवार गटात गेल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे वळसे पाटील हे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत गेल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR