27.3 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeउद्योगवरण-भात महागला!

वरण-भात महागला!

डाळ, तांदूळात २० टक्क्यांची वाढ

भंडारा/नागपूर : भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे मुख्य खाद्य भात आहे. जिल्ह्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होत असले तरी यंदा पावसाळ्यात महागाईमुळे तांदळाच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी डाळींचे उत्पादन घटल्याने यंदा २० टक्क्यांनी डाळींचे दर वधारल्याचे व्यापा-यांकडून सांगितले जात आहे.

गतवर्षी खरीप, रब्बी पिकांवर अतिवृष्टी व किडीचा प्रकोप झाला. परिणामी तांदळाचे व डाळीचे उत्पादन कमालीने घटले. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार २०२२ च्या तुलनेत डाळींच्या उत्पादनात घसरण झाली आहे. परिणामी, मसूर डाळ वगळता इतर डाळींच्या दरांनी यावर्षी शंभरी पार केलेली आहे. गतवर्षीच्या तुनलेत यावर्षी तूरडाळ १४० हून १८० रुपयांवर पोहोचली आहे. मूग ९० रुपयांहून १२० रुपयांवर गेली आहे. तसेच हरभरा डाळ ६० रुपयांहून ८० ते ९० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच तांदळाच्या दरातदेखील १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाईमुळे रोजच्या जेवणात आवश्यक असणारे वरण-भात खायचा की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी रब्बी हंगामावर अतिवृष्टीचा फटका बसला. पाऊस आणि अवकाळीमुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे डाळींच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. परिणामी, यावर्षी डाळींचे दर वाढलेले आहेत. तसेच तांदळाच्या दरात देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

डाळींच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत डाळींच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात तूरडाळीचीकिंमत सर्वाधिक वाढल्याचे दिसते. गतवर्षी १३० ते १४० रुपयांनी मिळणारी तूरडाळ यंदा १८० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे.

तांदळाचे दर प्रतिकिलो पूर्वीचे आताचे
काली मुछ ६० ८०
बासमती ८० ११०
जयश्रीराम ६० ७०
छत्रपती ५५ ६५
चिन्नोर ८० १२०

डाळींचे दर पूर्वीचे आताचे
तूर १४० १८०
मुंग ९० १२०
मसूर ८० १००
हरभरा ६० ८०
उडीद १०० १४०

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR