35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeराष्ट्रीयसाहित्य अकादमी २०२३ चे विविध पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमी २०२३ चे विविध पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : साहित्य अकादमीने बुधवारी (२० डिसेंबर) २०२३ चे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. अकादमीने कादंबरी श्रेणीत संजीव यांना हिंदीसाठी, नीलम शरण गौर यांना इंग्रजी आणि सादिक नवाब सहर यांना उर्दू आणि यासोबतच २४ भारतीय भाषांमधील लेखकांना पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. हे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक वारशाचे संवर्धन आणि जतन करते. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.

साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के श्रीनिवासराव यांनी रवींद्र भवन, मंडी हाऊस, नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात विजेत्याच्या नावाची घोषणा केली. गेल्या वर्षी हिंदी भाषेतील हा पुरस्कार बद्री नारायण यांना तुमडी के शब्द (काव्यसंग्रह) साठी देण्यात आला होता, तर उर्दूमध्ये अनीस अश्फाक आणि इंग्रजीमध्ये अनुराधा रॉय यांना प्रदान करण्यात आला होता.

२४ भाषांसाठी पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या २४ भाषांना दिला जातो. उर्दू, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, यात आसामी, बंगाली, डोगरी, कन्नड, मराठी आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR