23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रगाजावाजा न करता वसंत मोरे यांचा अर्ज दाखल

गाजावाजा न करता वसंत मोरे यांचा अर्ज दाखल

पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे रिंगणात उतरलेले वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ४ कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ रुपयांची मालमत्ता आहे. मोरे यांच्यावर ३ कोटी ४९ लाख २३ हजार ४३९, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १८ लाख ८९ हजार रुपयांचे कर्ज आहे.

मुलाच्या नावावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे. कोणताही गाजावाजा न करता मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोरे यांच्या अर्जाने पुणे शहरात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR