डेहराडून : मदरशे म्हणजे मुस्लिमांना धार्मिक शिक्षण देणारी संस्था असंच आजवरच चित्र होते. पण आता याच मदरशांमध्ये हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वेद आणि संस्कृत भाषाही शिकवण्यात येणार आहे, उत्तराखंडच्या मदरसा बोर्डाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
हा निर्णय ऐतिहासिक याचसाठी आहे की आजवर अशी गोष्ट मदशांबाबत कधीही झाली नव्हती. पण आता या घोषणेवरुन वाद निर्माण झाला आहे. जमीयत उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने या निर्णयाला विरोध केला आहे. उत्तराखंड मदरशा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी मदरशांमध्ये वेद आणि संस्कृत शिकवले जाणार असल्याची घोषणा केली. इथल्या साबिर दर्ग्याला त्यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की साबिर पाक यांचा दर्गा हा केवळ मुस्लिम समुदयांसाठीच नाही तर प्रत्येक धर्माला मानणा-या लोकांसाठी आस्थेचं प्रतिक आहे.
महापुरुषांचे आत्मचरित्र शिकविणार
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्पसंख्याक वर्गासाठी विविध योजना तयार करुन त्यांना विकासाच्या मार्गावर नेत आहेत. तसेच उत्तराखंडमध्ये गाय, गंगा आणि हिमालयाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज अभियान चालवेल तसेच मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासह योग, वेद आणि भारतीय महापुरुषांचे आत्मचरित्र देखील शिकवले जाईल.