32.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयसीमेवर रात्रभर गोळीबार

सीमेवर रात्रभर गोळीबार

अरनिया : जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा, पाकिस्तानी सैन्याने बीएसएफच्या चौक्यांना लक्ष्य करत जोरदार गोळीबार सुरू केला. यावर भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने अरनियाच्या सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामुळे नापाक पाकिस्तान कधी सुधारणार हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामुळे सीमालगतच्या भागात राहणा-या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीमेला लागून असलेल्या गावक-यांना सुरक्षितेसाठी जवळच बांधलेल्या बंकरचा आसरा घ्यावा लागला.

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्रीपासून अरनिया सीमेवर गोळीबार सुरू केला. अद्यापही येथे गोळीबार सुरु आहे. सीमाभागत सध्या गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. अरनिया सेक्टरमधील ग्रामस्थांनी सांगितलं की, गुरुवारी रात्री उशिरापासून हा गोळीबार सुरू आहे, आमच्या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर ही सीमा आहे, दोन-तीन वर्षांनी अशी घटना घडत आहे. संपूर्ण गावाने बंकरमध्ये आसरा घेतला आहे. काय होणार हे कोणालाच माहीत नाही. जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. अरनिया सेक्टरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

अरनिया सेक्टरमधील ग्रामस्थ त्रस्त
अरनिया सेक्टरमध्ये राहणा-या एका महिलेने सांगितले की, गुरुवारी रात्री ८ वाजता गोळीबार सुरू झाला. सर्वत्र जोरदार गोळीबार सुरू होता. सुमारे ४-५ वर्षांनी हा प्रकार घडला. प्रत्येकजण आपापल्या घरात आहे. आमच्या गावात लग्न होत होते, सगळे तिकडे गेले होते, जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की जिथे आहात तिथेच राहा, सध्या सगळे आपापल्या घरात लपले आहेत. या गोळीबारादरम्यान बीएसएफने सांगितले की, आम्ही त्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहोत. पाकिस्तानकडून हा अचानक गोळीबार का केला जात आहे, याबाबत कारण समोर आलेले नाही.

तीव्र निषेध नोंदविला
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी आंतरराष्ट्रीय सीमेवरील फॉरवर्ड पोस्ट आणि गावांवर नुकत्याच केलेल्या बेछूट गोळीबार आणि मोर्टारच्या गोळीबाराबद्दल पाकिस्तान रेंजर्सकडे तीव्र निषेध नोंदवला. अधिका-यांनी ही माहिती दिली. २०२१ नंतर पहिल्या मोठ्या युद्धविराम उल्लंघनात, पाकिस्तान रेंजर्सनी गुरुवारी रात्री आरएस पुरा सेक्टरच्या अर्निया भागात गोळीबार केला, जो सुमारे सात तास चालला. या गोळीबारात एक बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली. बीएसएफच्या एका अधिका-याने सांगितले की, सुचेतगडमधील सीमा चौकीवर कमांडर-स्तरीय बैठकीत पाकिस्तान रेंजर्सकडे निषेध नोंदवण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR