23.5 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeमनोरंजनविकीचा डान्स 'तौबा तौबा'!

विकीचा डान्स ‘तौबा तौबा’!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या ‘बॅडन्यूज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकीच्या ‘बॅडन्यूज’ सिनेमातील तौबा तौबा हे गाणे अलिकडेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील विकीच्या डान्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गाण्यातील त्याचे डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. एवढंच काय तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील विकीच्या डान्सचे कौतुक केलं आहे.

विकी कौशलचा डान्स पाहून सलमान खानदेखील आश्चर्यचकित झाला आहे. त्याने विकीचे कौतुक केले आहे. सलमानने विकी साठी इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. तौबा तौबा गाण्यातील विकीच्या डान्सचा व्हीडीओ त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ही स्टोरी शेअर करत सलमानने विकीचे कौतुक केले आहे. विकी डान्स मुव्ह्स कमाल आहेत. गाणं पण खूप छान वाटतंय. खूप सा-या शुभेच्छा असे सलमानने स्टोरीमध्ये म्हटले आहे.

सलमानने केलेले कौतुक पाहून विकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही स्टोरी शेअर करत त्याने सलमानचे आभार मानले आहेत. सो स्वीट ऑफ यू सलमान सर…थँक यू सो मच. माझ्यासाठी आणि टीमसाठी याचे खूप मोल आहे असे विकीने म्हटले आहे. केवळ सलमानच नव्हे तर ऋतिक रोशननेही विकी कौशलच्या डान्सचे कौतुक केले होते. विकीची डान्स स्टाइल पसंतीस उतरल्याचे ऋतिकने म्हटले होते. विकीचा तौबा तौबा डान्स पाहून नेटक-यांना कतरिना कैफच्या कमली कमली गाण्याची आठवण झाली होती. प्रदर्शित झाल्यापासूनच विकीचे हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

दरम्यान, विकी कौशलच्या ‘बॅडन्यूज’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. १९ जुलैला हा विकी कौशलचा हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR