24.6 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी दाखल

आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी दाखल

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी २५६ तक्रारींचा १०० मिनिटांत निपटारा करण्यात आला. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १० कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR