22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाविझाग कसोटी रोमांचक अवस्थेत

विझाग कसोटी रोमांचक अवस्थेत

मैदानाबाहेरून । डॉ. राजेंद्र भस्मे
भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेली दुसरी कसोटी अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. चौथ्या डावात पाहुण्यांना विजयासाठी ३३२ धावांची गरज आहे. यजमानांना नऊ गडी बाद करायचे आहेत. वेळ भरपूर आहे दोन दिवस म्हणजेच १८० षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे सामना अनिर्णीत होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणूनच या कसोटीत निकाल निश्चित लागेल.
शनिवारच्या धावसंख्येवर यजमानांनी सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा (१३)आणि पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल(१७) यांना जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीपुढे तंबूत परतावे लागले पण तिस-या क्रमांकावर आलेल्या शुभमन गिलने आपले तिसरे कसोटी शतक (११ चौकार व दोन षटकारांसह १०४) झळकावत यजमानांना ब-यापैकी आघाडी मिळवून दिली. त्याने श्रेयस अय्यर (२९)आणि अक्षर पटेल (४५) या दोघांबरोबर चांगली भागीदारी रचली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदार पहिल्या डावात ३३ व दुस-या डावात नऊ धावाच करू शकला. मधले सत्र यजमानांच्या बाजूने होते पण तिस-या सत्रात फिरकी गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. टॉम हार्टली (३) व रेहान अहमद (४) पाच बाद २१० वरून यजमानांचा डाव २५५ वर संपवला. पाहुण्या इंग्लिश संघाला विजयासाठी ३९९ धावांची गरज होती. सलामीवीर बेन डकेट बाद झाला. तिस-या दिवसाखेर पाहुण्यांच्या एक बाद ६७ धावा झाल्या आहेत. ‘बँझबॉल’ वृत्तीने खेळणारे इंग्लिश फलंदाज ३३२ धावा करू शकतील की अश्विन, अक्षर आणि कुलदीप यांच्या फिरकीसमोर लोटांगण घालतील हेच बघावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR