28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमिझोराममध्ये मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान

मिझोराममध्ये मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान

ऐझॉल : मिझोराममध्ये मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत, ८.५७ लाखांहून अधिक मतदार १७४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मधुप व्यास यांनी सांगितले की, मिझोराममधील सर्व १,२७६ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल आणि ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापैकी १४९ दुर्गम मतदान केंद्रे आहेत, तर आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सुमारे ३० मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

व्यास म्हणाले की, मिझोराममध्ये शांततेत निवडणुका पार पडण्याची परंपरा आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही ते कायम ठेवू. ४० सदस्यीय मिझोराम विधानसभेसाठी मतदानापूर्वी म्यानमारसह ५१० किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आणि बांगलादेशशी ३१८ किमी लांबीची सीमा सील करण्यात आली आहे. याशिवाय आसामचे तीन जिल्हे, मणिपूरचे दोन जिल्हे आणि त्रिपुराच्‍या एका जिल्‍ह्याला लागून असलेली आंतर-राज्य सीमा बंद करण्‍यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR