धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उद्या मतदान; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट सामना

धाराशिव : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी मतदान होत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यात सरळ सामना रंगला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून निकालातून मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीसाठी धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील एकूण २९ तालुक्यांमध्ये २९ मतदान केंद्रांची व्यवस्था निवडणूक विभागाने केली आहे. मतदान सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार असून प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे निवडणूक रिंगणातील दोन्ही प्रमुख उमेदवार हे धाराशिव जिल्ह्यातील असून उमरगा तालुक्याचे आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांनाही या निवडणुकीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असून उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

यंदाच्या निवडणुकीत मतदारसंख्या काहीशी घटली आहे. मागील निवडणुकीत एकूण १,००५ मतदार होते. मात्र यंदा १७ मतदारांची घट होऊन मतदारसंख्या ९८८ वर आली आहे. त्यामुळे प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतदारसंख्येच्या दृष्टीने लातूर जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये एकूण ३६७ मतदार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये ३१७ मतदार आहेत, तर बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ३०४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया रखडल्याने अनेक ठिकाणी सदस्य अस्तित्वात नसल्याचा परिणाम मतदारसंख्येवर झाल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या मतदारसंघातील निवडणूक ही केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून निकालातून मराठवाड्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज बांधला जाणार आहे.

आता मतदान प्रक्रियेनंतर २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यापैकी कोण विजयाची बाजी मारणार, याची उत्सुकता तीनही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news