30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयवाघोबांच्या सुंदरबनात मतदान पार पडणार!

वाघोबांच्या सुंदरबनात मतदान पार पडणार!

जंगलात १०१ वाघांचा वावर मतदान केंद्रांना बसविले नायलॉनच्या जाळ्यांचे कवच

कोलकाता : लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. दोन टप्यातील मतदान संपले असून ७ मे ला तिस-या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. भारतात असेही निवडणूक केंद्र आहेत जिथे मतदानासाठी मोठी कसरत करावी लागते. पश्चिम बंगालमध्ये वाघांपासून सुरक्षेसाठी नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. वाघांना मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्यापासून रोखण्यासाठी ह्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या सुंदरबनमधील लाहिरीपूर, जेम्सपूर, कुमिरमारी, छोटा मोल्लाखली आणि झारखली गावांच्या काठावर १२ किमी लांबीच्या नदीच्या काठावर नवीन नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जेणेकरून मतदानासाठी बाहेर पडलेल्या लोकांची सुरक्षा होईल. जयनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत गोसाबा आणि कुलतली विधानसभा मतदारसंघात पसरलेल्या या गावांमध्ये ५ लाखांहून अधिक मतदार आहेत. तर ताज्या जनगणनेनुसार किमान १०१ वाघ आहेत. नदीकाठावर असलेल्या या गावांमध्ये किमान ५७ मतदान केंद्रे आहेत.

सुंदरबनात अनेक वैशिष्टये आहेत. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांदरम्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले हे जगातले सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी सदाहरित जंगलातील स्पर्धात्मक वातावरणापासून फारकत घेऊन काही वनस्पती नद्यांच्या मुखाशी वसलेल्या भरती-ओहोटीच्या प्रदेशात राहू लागल्या. अनुकूलनातून त्यांनी स्वतमध्ये काही बदल घडवून आणले व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहण्याचे कसब बाणवले. काळाच्या ओघात साधारण ७० जातींच्या वनस्पतींनी अशा प्रकारे निराळे जीवन सुरू केले. समुद्राच्या क्षारतेसमोर टिकाव धरण्याची क्षमता असल्यामुळे या वनस्पतींना मराठीत ‘खारफुटी’ म्हणतात. नर्मदा व तापी सोडल्यास, भारतातील बहुतेक मोठ्या नद्या पूर्ववाहिनी असल्यामुळे, भारतात खारफुटी वनस्पती पूर्व किना-यावर जास्त प्रमाणात आढळतात.

चोख बंदोेबस्त असणार
निवडणूक जवळ आल्याने, दक्षता वाढवण्यात आली आहे आणि १२ किमी जुने कुंपण बदलण्यात आले आहे असे उपक्षेत्र संचालक जस्टिन जोन्स यांनी सांगितले. आपले सर्वाधिक लक्ष या संवेदनशील भागात असलेल्या बूथवर असल्याचे त्यांनी सांगितले.

१०६ किमीचे कुंपन
जंगलाच्या काठावर बाड, गोमोर, बिद्या, पिचखली आणि कपूरा या नद्यांच्या काठावर लावलेल्या जाळ्या अनेक वर्षापासून मानव-प्राणी संघर्ष रोखण्यात मदत करतात. सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात १०६ किमी नायलॉन जाळीचे कुंपण आहे आणि मोसमी वादळ, मातीची चोरीकिंवा मानवी क्रियाकलापांमुळे होणारे कोणतेही उल्लंघन यावर वनअधिकारी सतत लक्ष ठेवतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR