22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयबंगालमधील जयनगरमध्ये व्हीव्हीपॅट मशिन फेकल्या तलावात

बंगालमधील जयनगरमध्ये व्हीव्हीपॅट मशिन फेकल्या तलावात

कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमधून पुन्हा हिंसाचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बंगालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी ट्वीट करून सांगितले की, आज सकाळी ६.४० वाजता जयनगर लोकसभा मतदारसंघातील बेनिमाधवपूर एफपी स्कूलमधून काही राखीव ईव्हीएम आणि सेक्टर ऑफिसरचे पेपर जमावाने लुटले आणि दोन व्हीव्हीपॅट मशिन तलावात फेकल्या. या प्रकरणी सेक्टर ऑफिसरने एफआयआर दाखल केला असून, आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.

या घटनेनंतर सेक्टरमधील उर्वरित सहा बूथवर मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. नवीन ईव्हीएम आणि कागदपत्रे सेक्टर ऑफिसरला देण्यात आली आहेत. काही रिपोर्टस्मध्ये असा दावा करण्यात आला आहे की स्थानिक गुंडांनी प्रथम निवडणूक आयोगाच्या टीमला येथे येण्यापासून रोखले. यानंतर वाद सुरू झाला आणि काही लोकांनी व्हीव्हीपॅट उचलून जवळच्या तलावात फेकल्या.

मतदान केंद्राबाहेर भाजप उमेदवाराच्या विरोधात घोषणाबाजी

तर दुसरीकडे, कोलकाता उत्तर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार तापस रॉय यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. भाजप मतदान केंद्रात बोगस मतदान करत असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. दरम्यान, या घटनेबाबत भाजप उमेदवार तापस रॉयने सांगितले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. अशातच भांगरमध्ये सीपीआय (एम) आणि आयएएफ कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांवर बॉम्ब हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR