23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeमहाराष्ट्रवाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला. ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी मराठी, हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. त्यांनी कोंकणी आणि भोजपुरी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, सीने में जलन आखों में तुफाँ सा क्यु हैं, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले असे अनेक सुमधूर गाणी गायिली आहेत.

सुरेश वाडकर यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. पंडित जियालाल वसंत यांच्याकडे ते संगीत शिकले.दरम्यान, सुरेश वाडकर यांना यापूर्वी मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला. २०२० मध्ये सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबईच्या वतीने देण्यात येणारा स्वरमंगेश लता मंगेशकर पुरस्कारही सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR