31.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा

मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा

३ जिल्ह्यांना ८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील ५७ गावे व ११ वाड्यांना ८३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांत टँकर सुरू करण्याचे नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ८ गावे व ५ वाड्यांना १२ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यात फुलंब्रीतील १ गावात २ टँकर, पैठण तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे, वैजापूर तालुक्यातील १५ गावे व एका वाडीला १६ टँकरद्वारे तर गंगापूर तालुक्यातील तहानलेल्या ७ गावांना १० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ४२ गावे व ६ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरच्या मंजूर फे-यांची संख्या १०१ आहे. ५६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एक व माहूर येथील एका गावाला टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जालना जिल्ह्यातील १३ गावे व ५ वाड्यांना मिळून ३० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात जालना तालुक्यातील ३ गावे व २ वाड्यांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील ६ गावे व ३ वाड्यांना १२ टँकरने, अंबड तालुक्यातील ४ गावांना ६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR