21.1 C
Latur
Saturday, September 27, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरआम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आले

आम्ही ओबीसीत गेलो नाहीत, ओबीसी आमच्यात आले

जरांगे यांचा खळबळजनक दावा

जालना : मनोज जरांगे यांनी म्हटले की, आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे, बाकी मराठा नेते माझ्या विरोधात का जातात हे मला माहिती नाही. आमचा हक्क आहे आणि मी तो मिळवलाय. मराठे हे सर्वच आरक्षणात गेली आहेत. आपल्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण कोणासाठी आणि कशासाठी झुंजतोय. माझे पोरं करोडोंनी मुंबईला गेले आणि विजय घेऊन आले. हे आता काय लेखी नाही. याला जीआर म्हणतात. तो पुन्हा संविधानात घालण्यासाठी पारीत केला आहे. ओबीसी आमच्यात आला. आम्ही ओबीसीत गेलो नाहीत. आमचे मन मोठे होते, आमच्या पुर्वजांचे. आम्ही १८८१ ते आतापर्यंत आरक्षणात होतो. आम्ही अगोदरचेच आहोत. आता आमच्या एक गोष्ट लक्षात आली की, आजकाल आपल्या लेकरांना उंचीवर न्यायचे असेल आणि समाज प्रगतीकडे न्यायचा असेल तर आपल्याला आरक्षण घ्यावे लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्यात टप्यात मिळवले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मुंबईतील उपोषणानंतर सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जीआर काढला आहे. मात्र, यानंतर ओबीसी नेते आक्रमक होताना दिसत आहेत. मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती देखील सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात केली आहे. मात्र, सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. आता त्यावर बोलताना जरांगे हे दिसले आहेत. छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करताना मनोज जरांगे हे दिसले आहेत.

आता अंमलबजावणी होणार
जीआर अगोदरच निघाला आहे, आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. छगन भुजबळ यांना जीआर चांगला कळतो आणि त्यांनी एक दोन मोठे पक्ष हाताळले आहेत. बहुमताच्या सत्ता हाताळल्या आहेत, कॅबिनेट देखील यामुळे जीआरचा चांगला अभ्यास छगन भुजबळ यांना असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. ओबीसीमधून मराठा समाजाल आरक्षण देण्यात आल्याने ओबीसी समाज आणि त्यांचे नेते हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR