25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांची कोठडी आम्हाला नको : सीबीआय

केजरीवाल यांची कोठडी आम्हाला नको : सीबीआय

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय अधिका-यांनी शनिवारी राऊज अवेन्यू कोर्टात नेले. यावेळी सीबीआयने केजरीवालांसाठी रिमांड मागितले नाही. केजरीवालांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी सीबीआयने केली आहे.

राऊज अवेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवालांना तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले होते. शनिवारी ही कोठडी संपल्यानंतर सीबीआयने केजरीवालांना कोर्टासमोर सादर केले. शनिवार असल्यामुळे केजरीवालांची पेशी ड्यूटी मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर झाली.

यावेळी अरविंद केजरीवालांच्या वकिलांनी म्हटले की, आम्हाल न्यायालयीन कोठडीच्या विरोधात अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या, अशी बाजू त्यांनी मांडली. केजरीवालांचे वकील विक्रम चौधरी पुढे म्हणाले, ही अशी केस आहे ज्यात २०२२ पासून तपास सुरु आहे. ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. ज्यात सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला होता.

कोर्टाने म्हटले की, तुम्ही अर्ज का दाखल करु इच्छिता? जर तुम्हाला जामीन पाहिजे तर तुम्ही संबंधित कोर्टासमोर जामीन अर्ज करा. पोलिस कोठडी संपल्यानंतर कोर्टाकडे सीआरपीसीनुसार आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठण्याशिवाय काहीही पर्याय नाही. सीबीआयने ३ जुलैपर्यंत तपास पूण करण्याचं सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला जामिनासाठी अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे तुम्हाला न्यायालयीन कोठडी नको, असं म्हणता येणार नाही असे स्पष्ट करत कोर्टाने केजरीवालांच्या वकिलांना फटकारले आणि केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR