35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडा‘मुंबईचा साप गेल्यावर काठींचा मारा, हैदराबाद संघ गुंडाळला १७३ धावांवर सारा’

‘मुंबईचा साप गेल्यावर काठींचा मारा, हैदराबाद संघ गुंडाळला १७३ धावांवर सारा’

मुंबई : हार्दिक पांड्या आणि पियुष चावलाच्या भेदक मा-यासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी लोंटागण घातले. पांड्या आणि चावला यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी शानदार फलंदाजी केली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेटच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. हेड याने ४८ तर कमिन्सने ३५ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १७४ धावांचे आव्हान आहे. दरम्यान मुंबईला प्ले ऑफच्या शर्यतीतून सुर गवसल्याने साप गेल्यानंतर काठींचा मारा होतोय असे वाटत आहे.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणा-या हैदराबादची सुरुवात शानदार झाली, पण त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी ६ धावांची सलामी दिली. पण अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. अभिषेक शर्मा १६ चेंडूत ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर मयंक अग्रवाल फक्त पाच धावा काढून बाद झाला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर हेड आणि रेड्डी यांनी हैदराबादच्या डावाला आकार दिला.

हैदराबादची फलंदाजी ढेपाळली
टेविस हेड आणि रेड्डी यांच्या जोडी जमली असे वाटत होते, पण त्याच वेळी अनुभवी पियुष चावलाने हेडला बाद केले. ट्रेविस हेड याने ३० चेंडूमध्ये ४८ धावांची खेळी केली. हेड याने आपल्या शानदार खेळीमद्ये एक षटकार आणि सात चौकार ठोकले. हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेनही लगेच तंबूत परतला. पियुष चावला यानेच त्याचा अडथळा दूर केला. क्लासेन फक्त दोन धावांवर त्रिफाळाचीत झाला. नितीश रेड्डी १५ चेंडूमध्ये २० धावा काढून बाद झाला. यामध्ये दोन चौकाराचा समावेश होता. आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर शाहबाज अहमद आणि मार्को यान्सन यांनी डाव संभाळण्याचा जिवापाड प्रयत्न केला. पण मुंबईच्या गोलंदाजीसमोर ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. मार्को यान्सन यानं १२ चेंडूमध्ये १७ धावा जोडल्या. त्याने आपल्या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तर शाहबाद अहमद याने १२ चेंडूत १० धावा केल्या. अब्दुल समद आज फ्लॉप केला. समदला फक्त चार चेंडूत तीन धावा काढता आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR