29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरदेशातील सर्व घटकांचे कल्याण करणारा लोकप्रतिनिधी, पंतप्रधान देशाला पाहिजे

देशातील सर्व घटकांचे कल्याण करणारा लोकप्रतिनिधी, पंतप्रधान देशाला पाहिजे

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणापूर येथील जाहीर प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद रेणापूरसह परिसरातील नागरिकाकडून डॉ. शिवाजी काळगे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार

लातुर प्रतिनिधी :
देश आज राजकीय अराजकतेमधून सध्या जात आहे. स्वतंत्र पूर्व काळात अनेक थोर
महापुरुषांनी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली ज्याची दखल जगभरात घेतली जाते. देशातील सर्व घटकांचे कल्याण करणारा लोकप्रतिनिधी, पंतप्रधान देशाला पाहिजे, यासाठी
देशात इंडिया महाविकास आघाडीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे असे उद्गार
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी काढले आहेत.

लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी लातुर ग्रामीण मतदार संघातील रेणापूर या ठिकाणी जाहीर प्रचार सभा सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य व लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांच्या समवेत पार पडली. या सभेच्या प्रारंभी आदरणीय लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

देशातील सर्व घटकांचे कल्याण करणारा लोकप्रतिनिधी, पंतप्रधान देशाला पाहिजे सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, देश आज राजकीय अराजकते मधून सध्या जात आहे. स्वतंत्र पूर्व काळात अनेक थोर महापुरुषांनी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य दिले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली ज्याची दखल जगभरात घेतली जाते.

देशातील सर्व घटकांचे कल्याण करणारा लोकप्रतिनिधी, पंतप्रधान देशाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव,शिक्षण, आरोग्य देणारा पंतप्रधान आपल्या देशाला पाहिजे. दहा वर्षांपूर्वी तुम्ही जेथे होता तिथेच आहात आपण ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून सर्व सामान्य माणसाचा विकासाचा कधी विचार देखील केला नाही.

अच्छे दिनचे स्वप्न आपल्याला दाखविले आणि खिशे मोठ्या उद्योग पतीचे भरले सहकार महर्षी दिलीपराव देशमुख
काँग्रेस पक्ष एका विशिष्ट जातीसाठी काम करते अशी भावना आपल्या मनात निर्माण करीत आरक्षण व जाती पातीच्या नावाने आपल्यात तेढ निर्माण करण्याचे काम या सरकारने केले आसून केवळ काँग्रेस पक्षावर टीका करणे आणि
जनतेची दिशाभूल करणे हेच काम या देशाचे पंतप्रधान करत आहेत.मणिपूर ला भेट द्यायला वेळ नाही, सर्व सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही,अच्छे दिनचे स्वप्न आपल्याला दाखविले आणि खिशे मोठ्या उद्योग पतीचे
भरले ज्यामुळे आज आपण १० वर्ष यांच्या हातात सत्ता देऊनही जेथे होतो तिथेच अहोत.

आणि म्हणून आपले नेते राहुलजी गांधी यांनी आपल्या हातात
त्यांच्या स्वाक्षरीने ग्यारंटी कार्ड दिले आहे ज्यामधील ५ न्याय
मागण्या इंडिया आघडी सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट मध्ये मंजूर
केल्या जाणार आहेत यासाठी आपण या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना देशातील
कोट्यवधी शेतकऱ्यांचे भविष्य, महिलां भगिनी ची सुरक्षा, आपल्या मुलांना
नौकरी, वाढलेली महागाई कमी करायची असेल आणि देशातील कोट्यवधी लोकांचे
भविष्य बदलायचे असेल तर ही सुवर्ण संधी असून आपण सर्वांनी या सर्व गोष्टी
लक्षात घेऊन आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे असे आवाहन
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.

आम्ही रेणापूरसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून डॉ. काळगे यांच्या पाठीशी उभा राहावे
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातुर लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.रेणापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून रेणापूर ने मागितले ते आपल्या पक्षाने आपले आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी रेणापूर वासीयांना दिले आणि आजतागायत आम्ही रेणापूर साठी केलेल्या कामाची पावती म्हणून या निवडणुकीत आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या पाठीशी राहण्याची विनंती करतो आहोत.

रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्याचे काम काँग्रेस पक्षाने आणि आमच्या लोकांनी रेना साखर कारखान्याच्या माध्यमातून केले. आज जिल्हा बँकेकडून शून्य व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज
पुरवठा केला जातो कारण शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतुन बाहेर काढण्याची आमची बांधिलकी असून ती बांधिलकी जपण्याचे काम लातुर जिल्हा बँकेने केले आहे. आज लातुर पेक्षा काकणभर अधिकचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रेणापूरच्या शेतकऱ्यांना मिळत आहे. रेणापूर तालुक्यातील रस्त्याचे जाळे अधिक मजबूत कसे होईल,पिण्याचे पाणी,वीज पुरवठा, उद्योग वाढविण्यासाठी आपल्याला काम येणाऱ्या काळात करायचे असून विद्यमान घमेंडी सरकारने पक्ष फोडले, घरे फोडली हे आपण गेल्या कांही दिवसात पाहिले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखू शकत नाहीत सत्तेत राहण्याचा याना अधिकार नाही माजी मंत्री अमित देशमुख एक काळ होता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हात पकडून एका महिलेने सवाल केला होता पण आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारू शकत नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. महिला सुरक्षित नाहीत,
लातूरच्या पुण्यात शिकणाऱ्या भाग्यश्री सुडेची हत्या झाली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आपण कायदा व सुव्यवस्था राखू शकत नाहीत तर सत्तेत राहण्याचा याना अधिकार नाही. आरक्षण विषयावर एका समाजाला दुसऱ्या
समाजाच्या विरोधात उभे केले आणि हे सर्व यांच्या खुर्च्या शाबूत ठेवण्यासाठी सुरू आहे. यापूर्वी असे कधी घडले नाही महाराष्ट्र राज्याची एक उज्वल परंपरा असून या परंपरेला छेद बसला आहे असे माजी मंत्री अमित
देशमुख म्हणाले.

राजकारणात तत्व असतात पण या तत्वांना तिलांजली देण्याचे काम सरकारने केले पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात काही तत्व असतात पण या तत्वांना तिलांजली देण्याचे काम या सरकारने केले असून याला मूठमाती देण्याची वेळ आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आणि आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या रुपात आपल्या समोर असून आपण येणाऱ्या ७ तारखेला या देशात बदल घडवीण्यासाठी आपण सर्वांनी भरभरून मतदान करावे व इतरांना देखील मतदान करायला लावावे व आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना संसदेत
पाठवावे असे आवाहन उपस्थित सर्वाना आमदार देशमुख यांनी केले.

मतदारांचा उत्साह पाहून आम्हाला अधिकचे बळ मिळत आहे डॉ. शिवाजी काळगे यावेळी बोलताना मविआचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, आज प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर स्वतः न घेतलेलं कर्ज झाले आहे, सरकारने तेल आयात केले आहे, कांदा निर्यात गुजरात मधून करता येते आणि आपल्या महाराष्ट्रातून कांदा निर्यात करता येत नाही अशा चुकीच्या धोरणामुळे आज प्रत्येक घटक त्रस्त असून यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या निवडणुकीत पुढाकार घ्यावा लागणार आहे. यासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मागील महिनाभरापासून मी मतदाराना भेटत असून त्यांचा उत्साह पाहून आम्हला अधिकचे बळ मिळत आहे. आपण पाहत आहात गेल्या १० वर्षात राज्यातील व केंद्रातील
राज्यकर्ते सर्व सामान्य माणूस आणि शेतकरी यांच्या बद्दल किती उदासीन आहे हे आपण जाणून आहेत. आपल्याला या विद्यमान सरकारने केवळ भरमसाठ अश्वासने दिली पण प्रत्यक्षात एकही अश्वासन पूर्ण केली नाही, शेतीसाठी लागणाऱ्या
शेती अवजारे, यासह प्रत्येक वस्तूवर,खते तसेच बी बियाणे यावर जीएसटी लावली,शेतमालाला हमीभाव दिला नाही, उच्च शिक्षण घेऊन ही युवकांना नौकरीनाही या उलट उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक गुजरात मध्ये नेली, महिला भगिनी
सुरक्षित नाहीत आणि यावर बोलण्या ऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जातआहेत.

ही संपूर्ण परिस्थिती पाहता सर्व सामान्य माणसाच्या कल्यानासाठी
आपले नेते राहुलजी गांधी यांनी ग्यारंटी कार्ड तेही स्वाक्षरी सह
प्रकाशित करून मतदाराच्या हाती दिले असून आपले इंडिया आघाडी सरकार सत्तेत
येताच युवा न्याय, नारी न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय आणि
हिस्सेदारी न्याय अशा या ५ ग्यारंटी असलेल्या ग्यारंटी कार्डची पहिल्या
बैठकीत अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीच्या
पाठीशी उभे राहावे आणि बहुमताने मला विजयी करावे अशी विनंती त्यांनी
उपस्थित जनसमुदायला केली.

यावेळी बोलताना यशवंतराव पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता
शेवटच्या टप्प्यात आला असून या ठिकाणी आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा पार पडत आसून देशात आणि राज्यात आज सुरू
असलेली दडपशाही,आणि ईडी सीबीआय आशा केंद्रीय संस्था ची दहशत निर्माण करने
हेच सुरू आहे. या सर्व दहशत पसरविण्याचे काम करणाऱ्या सरकारला आपले नेते
अजिबात जुमाननारे नाहीत यामुळे आपण खंबीरपणे आपले नेते माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी
आणि शाश्वत विकासाची भूमिका घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी
राहावे व आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना विजयी करावे अशी विनंती
उपस्थिताना केले.

यावेळी बोलताना माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे म्हणाले की, आपल्या
सर्वांना लोकसभा निवडणूकिला येत्या ७ तारखेला सामोरे जायचे आहे. आपण गेल्या १० वर्षांपासून पाहतोय विद्यमान सरकारने आपल्या शेत मालाचे भाव पडून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम हाती घेऊन बड्या उद्योग पतींना
आणि परदेशातील शेतकऱ्यांना जगवत आहे, महागाई नियंत्रण न करता दिवसेंदिवस
वाढवून सर्वसामान्य जनतेचं जगणं कठीण झाले आहे या सर्व बाबींना या सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत असून अश्वासने देऊन ती न पाळणाऱ्या या जुलमी सरकारला आपल्याला सत्तेतून घालवायचे असून यासाठी आपण महाविकास
आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे याना निवडून द्यावे असे
आवाहन उपस्थिताना केले.

या जाहीर प्रचार सभेसाठी माजी आमदार त्र्यंबक भिसे,निरीक्षक सर्जेराव
मोरे, यशवंतराव पाटील,मतीनं भाई शेख,आबासाहेब पाटील,ऍड.समद पटेल,रवींद्र
काळे,अनिल फुलारी,चंद्रचूड चव्हाण,अनुप शेळके,माजी सरपंच मल्लिकार्जुन
हलकुडे, लालासाहेब चव्हाण, सौ. सोमाणी ताई,प्रमोद जाधव, संभाजी सुळ,मकबूल
वलांडीकर,चाँदपाषा इनामदार,संभाजी रेड्डी,रामदास पवार,हरिभाऊ
गायकवाड,पुजाताई इगे,शशिकांत आकनगिरे,माणिकराव चव्हाण,लक्ष्मणराव
मोरे,माणिकराव सोमवंशी, दिलीप पाटील, उमाकांत खलंग्रे,सुपर्ण
जगताप,व्यंकटेश पुरी यांच्यासह रेणापूर सह परिसरातील नागरिक, महिला
भगिनी,युवक,जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR