मुंबई : प्रतिनिधी
आयपीएल २०२६ मधील २४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यामध्ये मुंबईला घरच्या मैदानावर पंजाबने सात विकेटने पराभूत केले.
पंजाबने मुंबईच्या १९६ धावांची यशस्वीपणे पाठलाग केला. त्यामुळे क्विंटन डिकॉक याची शतकी खेळी वाया गेली. पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईची गाडी अजूनही विजयाच्या रूळावर येताना दिसत नाही तर दुसरीकडे पंजाबने या विजयासह पॉइंट टेबलमध्ये अग्रस्थानी झेप घेतली. पंजाब एकमेव संघ ठरलाय ज्यांनी यंदाच्या मोसमातील एकही सामना गमावलेला नाही. मुंबईचा हा सलग चौथा पराभव झाला असून आता पुढे त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय मिळवावाच लागणार आहे. या सामन्यानंतर श्रेयस अय्यर याने आपली प्रतिक्रिया दिली. आम्ही ज्या प्रकारे खेळत आहोत त्यावरून नक्कीच आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. प्रभसिमरन याने आपला खेळ उंचावला असून तो धावा करत होताच पण तो आता परिपक्व झाल्यासारखा खेळत आहे, असा श्रेयस अय्यर म्हणाला.

