36.4 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeक्रीडापरदेशी खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार का?

परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार का?

मुंबई : भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धतील उर्वरित सामन्यासंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामात रद्द करण्यात आलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यासह १७ सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १७ मे पासून आयपीएल स्पर्धेतील सामने पुन्हा खेळवण्यात येणार असून सुधारित वेळापत्रकानुसार, ३ जूनला या स्पर्धेची फायनल खेळवण्यात येणार आहे.

एका बाजूला आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर झाले असताना दुस-या बाजूला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढच्या महिन्यात ११ जून पासून सुरु होणा-या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली आहे. या संघातील अनेक खेळाडू आयपीएलचा भाग आहेत. नॅशनल ड्युटीसाठी तयार होण्याआधी ऑस्ट्रेलियन खेळाडू पुन्हा आयपीएलमध्ये दिसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भातही आपली भूमिका एकदम स्पष्ट केली आहे.

आयपीएल फायनलच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन खेळाडू कढछ स्पर्धेत खेळणार का? या प्रश्नासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या एक निवेदन जाहीर केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, आयपीएलमध्ये खेळायचं की नाही ते खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खेळाडूंच्या निर्णयाला पाठिंबा असेल. उर्वरित आयपीएल सामन्यात खेळणा-या खेळाडूंसाठी संघ व्यवस्थापन हळउ फायनलच्या दृष्टीने तयारी करेल, असा उल्लेखही करण्यात आला.

प्लेऑफ्सच्या शर्यतीत असणा-या आयपीएल फ्रँचायझी संघामध्ये मिचेल स्टार्क, जेक फ्रेजर-मॅकगर्क, स्पेंसर जॉनसन, मिशेल मार्श, जोश हेजलवूड, टिम डेविड, मार्कस स्टोयनिस, मिच ओवेन, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR