31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्या मुस्लिम वक्तव्यावरून अल्पसंख्याकसेल नाराज?

मोदींच्या मुस्लिम वक्तव्यावरून अल्पसंख्याकसेल नाराज?

पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती करणार मुस्लिमांची मते कोणत्या तोंडाने मागणार

नवी दिल्ली/बिकानेर : नवी दिल्लीतील एका दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीशी बोलताना गनी म्हणाले की, जनतेची संपत्ती हिसकावून मुस्लिमांना वाटली जात असल्याच्या मोदींच्या वक्तव्यामुळे मी निराश झालो आहे. जेव्हा मी भाजपाचा सदस्य म्हणून मुस्लिमांची मते मागायला जातो, तेव्हा ते मला पंतप्रधानांच्या टिप्पणीबद्दल विचारतात. मला लाज वाटते. मी मोदींना पत्र लिहून असे बोलू नका अशी विनंती करणार आहे.

बिकानेर अल्पसंख्याक सेलमधील काही भाजपा नेत्यांनीही गनी यांचे कौतुक केले आहे. गनी यांनी पक्षासाठी नेहमीच कष्ट घेतले, त्यामुळेच मी भाजपाकडे आकर्षित झालो आहे. माझ्यावर आधीच भाजपाचा प्रभाव होता. अल्पसंख्याक सेलमध्ये अनेक नेते आहेत, पण इथे गनीइतके कष्ट करणारा कोणीही नेता नाही, असंही पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुका तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले होते.

प्रत्येक जण त्यांना ओळखतो. ते पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा चेहरा होते आणि बिकानेरच्या बाहेरही सभांना हजेरी लावत होते असेही भाजपा नेते सांगतात. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धी कुमारी यांच्यासाठी बिकानेर पूर्व मतदारसंघात संयुक्तपणे प्रचार केला होता. गनी मूळचे बीकानेरचे असून, ते काही काळ पक्षात होते. त्यांनी १५-२० वर्षे संघात काम केल्याचा दावा केला होता. आधी ते अभाविप आणि नंतर भाजपामध्ये आले, असेही भाजपा अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमजान अली सांगतात. गनी केवळ सात ते आठ वर्षे पक्षात होते. ते पूर्वी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गेली तीन वर्षे जिल्हाध्यक्ष होते असेही अली म्हणालेत. गनी यांच्यावर भाजपाने योग्य कारवाई केली आहे. ते पक्षाशी एकनिष्ठ नसल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

पक्षात असताना तुम्ही पक्षाच्या विरोधात कसे बोलू शकता? मी गेली ४० वर्षे पक्षात आहे. काल पक्षात आलेले लोक मोदींबद्दल वाईट बोलत आहेत. गनी यांची काँग्रेसने दिशाभूल केल्याचेही ते म्हणालेत. भाजपाने त्यांना आदर, सन्मान आणि प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या भावाला तिकीट दिले. लोक त्यांना पक्षामुळे ओळखतात असेही अली सांगतात. गनी यांना ताब्यात घेण्याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गनी यांचा भाऊ मोईन खान याने २०१४ मध्ये बिकानेरमधील वॉर्ड क्रमांक ५५ मधून कौन्सिलरची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. बिकानेर पोलिसांनी शनिवारी गनीला ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. राजस्थानच्या बांसवाडा येथील एका सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR