26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeधाराशिवतुळजाभवानी मंदिराच्या विकासासह सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग करणार

तुळजाभवानी मंदिराच्या विकासासह सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग करणार

महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचा विकास करण्यासह सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच मागील १० वर्षांमध्ये ७५ लाख कुटुंबांना नळाचे कनेक्शन दिले. काँग्रेस सरकारच्या काळात १२ हजार कोटी रुपयांचे तर एनडीए सरकारच्या सव्वा लाख रुपयांचे भरड धान्य खरेदी केले.

विशेष म्हणजे विविध क्षेत्रात गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने जे केले नाही, ते भाजप प्रणित सरकारने केले असल्याचे सांगत भरड धान्यामध्ये भारताला आत्मनिर्भर बनविणार असल्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि.३० एप्रिल रोजी व्यक्त केला. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे सांगत अर्चनाताई पाटील यांना मत म्हणजे थेट मोदीच्या खात्यात मत असल्याचे सांगत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री मोदी यांच्या सभेचे आयोजन धाराशिव तुळजापूर हायवे लगत गेस्ट हाऊस समोरील मैदानावर करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, राजेंद्र राऊत, सतीश चव्हाण, विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, अ‍ॅड. मिलिंद पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, रिपाइंचे राजाभाऊ ओव्हाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंखे, सुनील चव्हाण, नितीन काळे, दत्ता कुलकर्र्णी, अ‍ॅड. व्यंकटराव गुंड, सुरेश पाटील, नंदाताई पुनगुडे, अस्मिता कांबळे, धनंजय सावंत, सुनील चव्हाण यांच्यासह उमेदवार अर्चनाताई पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, शक्तिशाली भारत व विकसित भारत करण्यासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असून १० वर्षांपूर्र्वी व आताचा भारत यामध्ये मोठा बदल झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत गगन यान अंतरिक्षामध्ये पाठविण्याची तयारी करीत आहे. कोरोना व्हॅक्सीन देखील भारताने तयार केले असून भारत व इतर देशातील नागरिकांचे प्राण वाचविले असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्र्वी शेतक-यांना युरिया विकत घेण्यासाठी काठ्या खाव्या लागत होत्या. मात्र आम्ही सत्तेत आल्यापासून युरिया कमी पडू दिला नाही. विशेष म्हणजे एक पोते युरिया एका बाटलीत आला असून त्याचा शेतक-यांना फायदा होणार असल्याचे सांगत अडीच लाख कोटी रुपये अनुदान दिले असल्याचे नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR