21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयपेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेणार

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेणार

भरतपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये निवडणूक प्रचारात आहेत. भरतपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मोदींनी आश्वासन दिले की, भाजपचे सरकार बनताच राजस्थानमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतला जाईल आणि जनहिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल. राजस्थानमधील काँग्रेस सरकार १२ रुपये प्रति लिटर दराने जनतेला लुटत आहे आणि काँग्रेस नेत्यांची तिजोरी भरत आहे. तर यूपी, हरियाणा आणि गुजरातमध्ये पेट्रोलचा दर ९७ रुपये प्रतिलिटर आहे.

गेहलोत यांच्यावर निशाणा साधत मोदी म्हणाले की, येथे काही लोक स्वत:ला जादूगार म्हणवतात. आता ३ डिसेंबरला काँग्रेसला हात घातला जाईल, असे राजस्थानची जनता म्हणत आहे. हे पुरुषांचे राज्य असल्याच्या यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांच्या वक्तव्यावर मोदी म्हणाले की, महिलांचा अपमान करणा-या मंत्र्याला तिकीट देऊन बक्षीस मिळाले आहे. या पापात काँग्रेस हायकमांडही सहभागी झाली आहे. कदाचित त्या मंत्र्यांकडेही  अशी काही माहिती असेल किंवा लाल डायरी असेल. भाजप सरकारमध्येही ही माहिती समोर येईल. भरतपूरच्या सभेनंतर मोदी नागौरलाही जाणार आहेत. जाट समाजाचे लोकदैवत तेजजी महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर ते निवडणूक सभेला संबोधित करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR