31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे राजकारणातून गायब होणार?

शिंदे राजकारणातून गायब होणार?

मुंबई : साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीत आलो आहे. साईबाबांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच आहे आणि महाराष्ट्रालाही आहेत. त्यांना शिर्डीतून का व कोणासाठी धावाधाव करावी लागते आहे हे मला माहिती नाही. शिर्डीतील त्यांचा उमेदवार हा शंभर टक्के पडतो आहे. आमचे भाऊसाहेब वाकचौरे यांना साईबाबा आणि जनतेचा आशीर्वाद आहे. लोकसभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणातच राहणार नाहीत, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना क्लीन चिट दिली. यावर बोलताना, निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून भारतीय जनता पार्टीची शाखा आहे. निवडणूक आयोगाकडून नि:पक्ष कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. केंद्रात आमचे सरकार येईल त्यानंतर या सगळ्या घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR