17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइस्राईल-हमासमध्ये युद्धविराम होणार?

इस्राईल-हमासमध्ये युद्धविराम होणार?

तेलअवीव : इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठीचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. शनिवारी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की गाझामध्ये हिंसाचार पुन्हा सुरू झाल्याबद्दल त्यांना चिंता वाटत आहे. इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठी ते कतारला जात असल्याचेही मॅक्रॉन यांनी सांगितले. इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्धविराम शुक्रवारी संपला, त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाला.

कॉप २८ परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन दुबईला पोहोचले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी इस्राइल आणि हमास यांच्यात पुन्हा युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू करण्याबाबत सांगितले. मॅक्रॉन म्हणाले की, आम्ही अशा परिस्थितीत आलो आहोत जेव्हा इस्रायली सरकारने अत्यंत अचूकतेने आपली उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहे. हमासला काय पूर्णपणे नष्ट करू शकते? असे झाल्यास, यास १० वर्षे लागू शकतात. मॅक्रॉन म्हणाले की, पॅलेस्टिनी लोकांच्या जीवावर इस्राइलमध्ये शांतता नांदू शकत नाही. याबाबत स्पष्ट बोलण्याची गरज आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर इस्राइलच्या पंतप्रधानांचे सल्लागार मार्क रेगेव्ह म्हणाले की, इस्राइललाही गाझामध्ये लढाईच्या वेळी गोळीबारामुळे नागरिकांचा मृत्यू व्हावा असे वाटत नाही. निष्पाप नागरिकांची कत्तल करणा-या हमासला इस्राइल लक्ष्य करत आहे. गाझामधील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी इस्रायल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

गाझामध्ये पुन्हा हिंसाचार
इस्त्राइल आणि हमास यांच्यातील पहिला युद्धविराम २४ नोव्हेंबरपासून सुरू झाला आणि सुमारे एक आठवडा चालला. यावेळी दोन्ही बाजूंनी ओलिसांची सुटका करण्यात आली. हा युद्धविराम शुक्रवारी संपला, त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाला, ज्यावर जगभरातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR