26.1 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रदूध दरावर तोडगा निघणार?

दूध दरावर तोडगा निघणार?

विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

मुंबई : प्रतिनिधी
दूध दराच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दूध उत्पादक शेतक-यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. दुधाच्या दरात वाढ करावी ही मागणी करत आहेत. दरम्यान, याच मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूध दरासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक विधिमंडळात होणार आहे.

दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. शनिवारी विधानभवनात होणा-या या बैठकीत दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे. या बैठकीला राज्यातील खासगी तसेच सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतक-यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत शेतक-यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच या बैठकीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत
सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याविरोधात विविध शेतकरी संघटनांसह किसान सभा आक्रमक होताना दिसत आहे. सध्या दुधाला कुठे २५, तर कुठे २६ रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने याची दखल घेऊन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल, असा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे. दुधाला ३४ रुपये दर देण्याच्या विखे पाटलांच्या घोषणेचे काय झाले? यासाठी किसान सभा आक्रमक झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR