ढाका : बांगलादेशात रविवारी वेतनवाढीच्या मागणीसाठी वस्त्र कारखान्यांतील कामगारांनी निदर्शने केली. यावेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला.
राजधानी ढाक्यातील मीरपूर परिसरात कामगारांनी रस्ते अडवले. यावेळी पोलिसांवर विटा-दगड फेकण्यात आले आणि पोलिसांच्या एका वाहनालाही आग लावण्यात आली. गाझीपूरमध्ये निदर्शकांनी महामार्ग रोखून पोलिस चौकी पेटवून दिली. तर, अशुलिया परिसरात किमान ३० कारखाने बंद राहिले. कामगारांची मागणी आहे की, त्यांचे किमान मासिक वेतन १२,५०० टक्यांवरून वाढवून ३० हजार टका (सुमारे २३ हजार रुपये) करण्यात यावे. रविवारी सकाळी ढाक्यातील मीरपूर-१० चौकात कामगार जमले. यावेळी त्यांनी रस्ते अडवले. त्यामुळे कामगार आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही कामगारांनी पोलिस कर्मचा-यांवर विटा-दगड फेकले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला हटवण्यासाठी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. दुपारी सुमारे १२ वाजता मीरपूर-११ मेट्रो स्थानकाखाली उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनालाही आग लावण्यात आली. मीरपूर-१० मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वारही बंद करावे लागले. शनिवारीही कामगारांनी याच परिसरात सुमारे चार तास रस्ते अडवून ठेवले होते.
पोलिस चौकीला आग लावली
ढाक्याच्या उत्तरेस असलेल्या गाझीपूरमधील कालीआकैअर परिसरातही रविवारी सकाळपासून निदर्शने सुरू झाली. गाझीपूरच्या कोनाबाडी परिसरात निदर्शकांनी एका पोलिस चौकीला आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या पाच तुकड्या तैनात करण्याची घोषणा केली.
पोलिसांनी लाठीचार्ज केला,
अश्रुधुराचाही वापर केला
रविवारी सकाळी ढाक्यातील मीरपूर-१० चौकात कामगार जमले. यावेळी त्यांनी रस्ते अडवले. त्यामुळे कामगार आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही कामगारांनी पोलिस कर्मचा-यांवर विटा-दगड फेकले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला हटवण्यासाठी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. दुपारी सुमारे १२ वाजता मीरपूर-११ मेट्रो स्थानकाखाली उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनालाही आग लावण्यात आली.
















