21.1 C
Latur
Saturday, September 27, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरयशवंत विद्यार्थी योजना कागदावरच, प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७० हजार लाटले

यशवंत विद्यार्थी योजना कागदावरच, प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७० हजार लाटले

धनगर समाजाची मोठी फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वाकांशी योजना राबवली जात आहे. श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या नावे ही योजना अंमलात आणण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाबरोबरच वसतिगृहाची सोय करण्यात येते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे प्रतिवर्षी ७० हजार रुपये देण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थी, वसतिगृह आणि सगळेच काही कागवर आहे असे असले तरी याचे पैसे मात्र उचलले गेले आहेत.

पहिले स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल आसेगाव या ठिकाणी भेट दिली. इथे विद्यार्थी आणि वसतिगृह कागदावरच असल्याचे दिसून आले. संस्थाचालकाने मात्र याचे अनुदान लाटले. वस्तुस्थिती पाहिली तर इथे एकही विद्यार्थी दिसला नाही. कम्प्युटर बंद पडलेले, अशी स्थिती या ठिकाणची होती. संस्थाचालकाने गेल्या वर्षी अनुदान मिळाल्याचे मान्य केले. १०० विद्यार्थ्यांची मान्यता या शाळेला आहे.

गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल या दुस-या शाळेला भेट दिली. निवासी शाळा असल्याने संध्याकाळी साडेसात वाजता शाळेचा रियालिटी चेक केला. इथे एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे इथे ना होस्टेल… ना विद्यार्थी… आणि मंजूर विद्यार्थी संख्या १०० आहे. यानंतर श्री योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महालपिंपरी इथे मात्र विद्यार्थी दिसून आले. विद्यार्थ्यांची मंजूर संख्या १००, परंतु ६८ विद्यार्थी कागदावर आणि २५ विद्यार्थी उपस्थित होते. दोन खोल्यात विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबण्यात आले आहे. या विदारक स्थितीत हे विद्यार्थी राहतात. तसेच मुले आणि मुली एकाच रूममध्ये राहत असल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR