मुंबई : काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा ‘टू मच’ हा शो खूप गाजतोय. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन धमाल करत आहेत. नुकतेच जान्हवी कपूर आणि करण जोहर या शोमध्ये पोहोचले. फीजिकल चीटिंग, इमोशनल चीटिंग सारखअया मुद्द्यांवरही ते बोलले. यावेळी जान्हवीने आपण प्लास्टिक सर्जरी केल्याचे स्वीकारले.
ती म्हणाली, मी आजपर्यंत जे काही केले आहे ते अगदी विचारपूर्वक आणि माझ्या आईनेच दिलेल्या सल्ल्यावरुन केले. आई माझ्यासोबत नेहमीच उभी होती. जर एखादी मुलगी असे व्हीडीओ किंवा कमेंट्स बघत असेल तेव्हा तिलाही तिचे लूक्स बदलण्याची गरज आहे असे वाटते. बफेलो प्लास्टिक सर्जरी करावी वाटते. हा,पण यात जर काही चुकले तर त्याहून वाईट काही नसते. त्यामुळेच पारदर्शकता खूप गरजेची आहे.
ती पुढे म्हणाली माझा गेटकीपिंगवर विश्वास नाही.
सोशल मीडियामुळे सुरुवातीला मी सुद्धा खूप प्रभावित व्हायचे. प्रत्येक जण कसा दुस-याबद्दल मत बनवतो आणि दिसण्यावरुन कमेंट्स करतो. परफेक्ट असणे गरजेचेच आहे असे तरुण मुलींना वाटते जे चुकीचे आहे. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते तुम्ही केले पाहिजे. जान्हवी कपूरने २०१८ साली धडक सिनेमातून पदार्पण केले. यानंतर ती गुंजन सक्सेना, रुही, उलझ, मिली, देवारा, परम सुंदरी आणि आता नुकतेच सनी संस्कारी की तुलसी कुमारीमध्ये दिसली.

