पाक भारतात खेळणार नाही

नवी दिल्ली/चेन्नई : पाकिस्तानचे क्रीडा क्षेत्र उद्ध्वस्त होताना दिसू लागले आहे. भारतात पुढील महिन्यात होणा-या एफआयएच पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानने आपल्या संघाचे नाव काढून घेतले आहे. भारतासोबतचा तणाव आणि सुरक्षा अशी दोन कारणे देत पाकिस्तानने पळ काढला आहे.

२८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत चेन्नई आणि मदुराई येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने या स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आहे. तसेच २०२३ मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघदेखील भारतात खेळून गेला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपवेळी मात्र पाकिस्तान संघाने भारतात न खेळण्याची भूमिका घेतली होती. परंतू, हॉकी संघाला सुरक्षेची कोणती काळजी लागली आहे, हे पाकिस्तानलाच माहिती आहे.

पाकिस्तान हॉकी महासंघाचे सचिव राणा मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आपल्या सरकारचा सल्ला घेतला आहे. सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. विद्यमान राजकीय तणावामुळे ज्युनियर संघाला भारतात पाठवणे शक्य होणार नाही, कारण हा एक मोठा सुरक्षा धोका असणार आहे, असे सरकारने म्हटले आहे. तसेच आम्ही अलीकडील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संबंधात अंतर पाहिले. भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि त्यांनी मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला आहे.

पाकिस्तानच्या ज्युनियर संघाने यापूर्वी ऑगस्टमध्ये आयोजित केलेल्या आशिया कप स्पर्धेतूनही माघार घेतली होती. त्या माघारीमुळे त्यांना पुढील वर्षी होणा-या विश्वचषकाची पात्रता गमवावी लागली होती. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतून माघार घेण्यासाठी क्रिकेटमधील नाराजीचे आणि हस्तांदोलन न करण्याचे कारण देणे हास्यास्पद मानले जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news