तू माझ्या आयुष्यातील सर्वांत अनमोल आशीर्वाद; कतरिना कैफने शेअर केले मुलासोबतचे खास फोटो

मुंबई : नुकताच अभिनेत्री कतरिना कैफने तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. यानंतर आता तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत पती अभिनेता विकी कौशल आणि मुलगा वियानची झलकही पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, वियानचा चेहरा न दाखवता त्याचे काही गोंडस क्षण कॅमे-यात टिपले आहेत. १६ जुलै रोजी कतरिनाने तिचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस तिच्यासाठी खास ठरला, कारण मुलगा वियानसोबतचा तिचा हा पहिलाच वाढदिवस होता. आता तिने या खास दिवसाच्या आठवणी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत.

या पोस्टसोबत कतरिनाने भावनिक कॅप्शन देत लिहिले. ती म्हणते, ‘तू माझ्या आयुष्यातील सर्वांत अनमोल आशीर्वाद आहेस. देवाने दिलेल्या या सुंदर भेटीसाठी मी कायम आभारी आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वाढदिवस होता आणि त्यामागचे कारण तूच आहेस.’
फोटोंमध्ये कतरिना केशरी आणि निळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये विकी कौशलही तिच्यासोबत दिसत असून, त्यांच्या कुटुंबातील हे खास क्षण चाहत्यांच्या मनाला भिडले आहेत. कतरिनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.

फोटोंमध्ये कतरिना वियानला मांडीवर घेऊन प्रेमाने पोज देताना दिसते. एका फोटोत वियान आईचे नाक पकडताना दिसत असून, हा क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, कतरिनाने अद्याप मुलाचा चेहरा सार्वजनिक केलेला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news