बीड : बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता समोर येत आहे. जाळपोळ पूर्वनियोजित असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालात ही शक्यता वर्तवली आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण २५ वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान जाळपोळीचा प्रकार मराठा समाज किंवा स्थानिकांनी केला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता.
बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांची कार्यालयेही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे.
कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण २५ वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत ९९ तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यात अनेक तरुण बिगरमराठा आहेत. बीड शहरात अटक करण्यात आलेल्या ४२ तरुणांपैकी १० पेक्षा जास्त तरुण बिगर मराठा आहेत. तसेच यामध्ये शिक्षण घेणा-या तरुणांचा मोठा गट आहे. या संदर्भातील अधिक तपास पोलिस करत आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
बीड आणि माजलगावमध्ये जमावाने जी जाळपोळ केली आहे त्यामध्ये सर्वाधिक तरुण शिकलेली मुले असून अशा जमावामध्ये तरुण मुलांनी कायदा हातात घेऊन आपले करिअर बरबाद करू नये असे मत औरंगाबाद परिक्षेत्राचे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. जाळपोळी प्रकरणी आतापर्यंत ९९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सुद्धा आय. जी. चव्हाण यांनी दिली आहे. माजलगावमध्ये आणि बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून आयोजित ज्ञानेश्वर चव्हाण हे बीडमध्येच तळ ठोकून पोलिस ही जाळपोळ कोणी केली याचा कसून शोध घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आय. जी. चव्हाण यांनी केले आहे.