29.6 C
Latur
Tuesday, April 8, 2025
Homeलातूरबोरसुरी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

बोरसुरी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

निलंगा : निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावातील अतिशय गरीब कुटुंबातील मजुराचा वीज पडून सोमवारी ता. २२ रोजी मृत्यू झाला आहे. बोरसुरी गावातील मुस्तफा शफीर पठाण, वय वर्ष ३४, शेतावरून गावाकडे येत असताना अवकाळी पावसात ४:३० च्या सुमारास घराकडे येत असताना विज पडून मृत्यू झाला. हा तरूण गावातील तरुण, मजुरी करून खाणारा आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला असून सकाळी तीव्र उन्हाच्या झळा आणि दुपारनंतर पाऊस अशी स्थिती आहे. आज पुन्हा तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले असून सोमवारी ता. २२ रोजी विज पडून सदर शेतक-याचा मृत्यू झाला या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकाचे व फळपिक, भाजीपाला याचे नुकसान झाले असले तरी उन्हाळ्यातच दररोज पाऊस सुरू असल्याने शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR