31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूररोहयोच्या कामावर पावणेदोन लाख मजूरांच्या हाताला काम

रोहयोच्या कामावर पावणेदोन लाख मजूरांच्या हाताला काम

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातंर्गत सिंचन विहिर, जनावरांचा गोठा, घरकूल, बांबू लागवड, रस्ते, वृक्ष लागवड व संगोपण अशा २ हजार १९६ कामे सुरू असून या कामावर १ लाख ७८ हजार ८५७ मजूरांचे हात राबत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे जिवनमान उंचावण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातंर्गत सुरू असलेल्या सिंचन विहिर, जनावरांचा गोठा, घरकूल, बांबू लागवड, रस्ते, वृक्ष लागवड व संगोपण, शोषखड्डे, स्मशानभूमी शेड, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाच्या माध्यमातून होते.

त्यामुळे गावाला व नागरीकांना पायाभूत सुविधाही उपलब्ध होतात. जिल्हयात ३ लाख ७७ हजार ६९० कुटूंबातील ८ लाख ९२५ नागरीकांनी रोजगारासाठी नोंदणी करून जॉबकार्ड काढले आहेत. जिल्हयातील ४४१ गावामध्ये सध्या रोहयोची २ हजार १९६ कामे सुरू असून या कामावर १ लाख ७८ हजार ८५७ मजूरांचे हात राबत आहेत. यात सर्वाधिक सिंचन विहिरीच्या १ हजार ३४७ कामावर १ लाख १२ हजार ८८२ मजूर राबत आहेत.

वृक्ष लागवड व संगोपणाची १४६ कामावर २ हजार ८७७ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. घरकूलाच्या २३२ कामावर ६ हजार १९२ मजूर राबत आहेत. शेततळयांच्या २४ कामावर २ हजार ७३१ मजूर राबत आहेत. २७९ शेतरस्त्यांच्या कामावर ४४ हजार ८०६ मजूरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. शेततळयांच्या २४ कामावर २ हजार ७३६ मजूर राबत आहेत. या बरोबरच शोष खड्डे, स्मशानभूमी आदी राहयोची कामे सुय आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR